Sunday, May 19, 2024

नगर पुणे हायवेवर मध्यरात्री लुटमारी…एका जणाकडील साडे अकरा लाखांचा ऐवज लांबवला…

नगर-पुणे महामार्गावरील पवार वाडी घाटात अज्ञात तीन दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकरणी श्रीधर दत्तात्रय वर्धे (वय, ५७ वर्षे रा. शाकुंतला अपार्टमेंट, सदाशिव पेठ, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरुन सूपा पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी हे दि.५ मे रोजी त्यांच्या मित्रासोबत कामाच्या निमित्ताने आले होते.

दि. ६ रोजी घरी पुण्याच्या दिशेने जात असतांना मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील पवार वाडी घाटात काळ्या विनानंबरच्या पल्सर मोटार सायकलवरून अज्ञात तीन जणांनी त्यांचा पाठलाग केला.

रस्त्यावर दुचाकी आडवी लावून अनोळखी तीन जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील २० हजार रुपये किंमतीची एक सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ८० हजार रुपये किंमतीची सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली त्यामध्ये एक कॅरेट वजनाचा हिरा असलेली ६ ग्रॅम वजनाची अंगठी, ५० हजार रुपये किंमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ५० हजार रुपये किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हातातील कडे, ५ लाख रुपये किंमतीची सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली त्यामध्ये पुष्कराज खडा असलेली २० ग्रॅम वजनाची अंगठी, ९० हजार रुपये किंमतीची सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली त्यामध्ये हिरा असलेली १० ग्रॅम वजनाची अंगठी, २ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली साखळी, ९० हजार रुपये किंमतीची पांढर्‍या सोन्याच्या धातुमध्ये बनवलेली अंगठी,

तसेच खिशातील पाकीट त्यामध्ये एस.बी.आय चे क्रेडेट कार्ड, डेबीट कार्ड, विश्वेश्वर बँक २ डेबीट कार्ड, एक्सेस बँकेचे डेबीट कार्ड, शरद सहकारी बँकेचे डेबीट कार्ड, आधार कार्ड, पैन कार्ड इसकॉन लाईफ मेंबरशिप कार्ड, ३५ हजार रुपयांच्या चलनी नोटा असा एकूण ११ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लटून नेला. घटना घडल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. आपल्यावर झालेला प्रकार पोलीसांसमोर कथन केला नंतर सुपा पोलिसांनी अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles