भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख ‘लांडगा’ असा केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता पडळकरांना काळं फासा आणि एक लाख मिळवा, अशी घोषणा अजित पवार यांच्या गटातील नागपूर शहरांध्यक्षांनी केली आहे.
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, “पडळकर दिसतील तिथे भर चौकात जोड्यानं मारा. नंतर पडळकरांना काळं फासून नागपूरला येत एक लाख मिळवा. हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करत आहे.”






