सकीना-तारा सिंहच्या लव्ह स्टोरीमध्ये नाना पाटेकरांची दमदार एंट्री, दिसणार ‘या’ भूमिकेत

0
26

‘गदर 2’ या चित्रपटात नाना पाटेकर कोणत्याही भूमिकेत नसून त्यांनी या चित्रपटाला आवाज दिला आहे. नाना पाटेकरांच्या दमदार आवाजात या चित्रपटाची सुरुवात होणार आहे. याबाबच तरण आदर्श यांनी ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये नाना पाटेकर डबिंग करताना दिसत आहे. या ट्वीटमध्ये तरण यांनी लिहिलं आहे की, “नाना पाटेकर यांनी ‘गदर 2’ या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला नाना पाटेकरांच्या आवाजात ‘गदर 2’बद्दल माहिती देण्यात येणार आहे.”