औषधांचा तुटवडा… शासकीय रुग्णालयात २४ तासांत १२ नवजात शिशूंसह २४ जणांचा मृत्यू!

0
40

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत.

हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा केला आहे. शिवाय रुग्ण गंभीर होते असे स्पष्टीकरण दिले आहे.