Monday, May 20, 2024

मंत्री छगन भुजबळ ‘तुतारी’चे काम करीत आहेत, सत्ताधारी आमदाराचा गंभीर आरोप

नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीचे नेते तुतारीचा प्रचार करत असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत”, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. “छगन भुजबळ यांना महायुतीमधून मंत्रीपद मिळाले आहे आणि काम करायच्या वेळी ते तुतारीचा प्रचार करत आहेत. तुम्हाला तुतारीचा एवढा पुळका असेल तर तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचे काम करा. भाजपाचेही नेते जर शांतपणे हे पाहत असतील तर हे दुर्दैव आहे”, अशी टीका सुहास कांदे यांनी केली.

नाशिकमधील नांदगाव विधानसभेत छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles