Monday, May 20, 2024

स्वतः शरद पवारांनी सांगितलं, मी राजीनामा देतो, तुम्ही सरकारमध्ये जा…. अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

: ‘1 मे होता, त्यांनी मला बोलून सांगितलं, मग साहेबांनी सांगितलं, सरकारमध्ये तुम्ही जा, मी राजीनामा देतो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. पण दुसऱ्या दिवशी 2 तारखेला एक कार्यक्रम झाला. कुणालाच काही माहित नव्हतं. फक्त घरातील 4 लोकांना माहिती होतं. तिथे एक कमिटी स्थापन करून अध्यक्ष निवडण्याचंही ठरलं होतं. त्यानंतर चव्हाण सेंटरला शरद पवारांनी राजीनामा दिला, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला आणि शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला, याबद्दलचा खुलासा केला आहे.

जयंत पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ यांच्यासह आम्ही 10 बारा जण बैठकीला होतो. काय करायचं काय, करायचं नाही याचा विचार करत होतो. डायरेक्ट शरद पवारांना सांगता येत नव्हतं. मग आम्ही सुप्रिया सुळे यांना घरी बोलावलं. तिला माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी 7 दिवस मागून घेतले होते. मग आम्ही 7 ते 8 दिवस थांबलो. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासोबतही बैठक झाली. बहुजन समाज आणि इतरांसाठी काय करायचं याबद्दल विचार केला आणि थेट साहेबांकडे गेलो. त्यांना सगळं सांगितलं. वेळ जात आहे काही तरी निर्णय घ्या, असं आम्ही सांगत होतो. त्यानंतर 1 मे होता, त्यांनी मला बोलून सांगितलं, मग साहेबांनी सांगितलं, सरकारमध्ये तुम्ही जा, मी राजीनामा देतो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. पण दुसऱ्या दिवशी 2 तारखेला एक कार्यक्रम झाला. कुणालाच काही माहित नव्हतं. फक्त घरातील 4 लोकांना माहिती होतं. तिथे एक कमिटी स्थापन करून अध्यक्ष निवडण्याचंही ठरलं होतं. त्यानंतर चव्हाण सेंटरला शरद पवारांनी राजीनामा दिला, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

इथं आनंद परांजपे बसला आहे, शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतलं. यशवंत चव्हाण सेंटरवर आंदोलन करण्यासाठी युवक आणि कार्यकर्ते पाहिजे, असं सांगितलं. मला हे कळलंच नाही. नेमकं राजीनामा कशाला दिला, जर राजीनामा द्यायचा नव्हता, तर मग दिलाच कशाला. मग त्यानंतर राजीनामा मागे घेतला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष केलं. पण हा धरसोड काही पटत नाही. एक घाव दोन तुकडे केले पाहिजे, अशी भूमिका पाहिजे होती, अशी टीकाही पवारांनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles