Saturday, May 25, 2024

शरद पवारांनी मला ५ वर्षांपूर्वीच ऑफर दिली होती…ॲड. उज्वल निकम यांचा खुलासा…

लोकसभेसाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. यानंतर आता त्यांचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाला आहे. उज्वल निकम म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी मला राजकारणाची ऑफरच होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावे मला ऑफर दिली होती. शरद पवार साहेबांनी मला सांगितलं होतं. त्यांनी चाळीस मिनिटे माझ्याशी चर्चा केली. तुम्ही राजकारणात उभे राहा. वयाचा विचार करता तुम्ही दहा वर्ष राजकारणात पाहिजे. पवार साहेंबाचा हेतू प्रामाणिक होता. मी म्हणालो, विचार करु सांगतो,” असा खुलासा उज्ज्वल निकम यांनी केला.

राजकीय पक्षांच्या पलीकडे माझे सर्वांशी चांगले आणि सलोख्याचे संबंध आहेत. कुणाशी व्यक्तिगत शत्रुत्व असण्याचं कारण नाही . मी कधीही कोणत्याही राजकीय नेत्याला याची बदली करा, त्याची बदली करा, असे सांगितले नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles