भाजपकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ विधीज्ञ उज्जवल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर आता पूनम महाजन यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केली आहेत.
भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर पूनम महाजन यांनी शनिवारी(ता.27) ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात,गेल्या दहा वर्षांपासून एक खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी देण्यात आली.त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील त्यांनी ट्विटमधून मानले आहे.
तसेच मला एक खासदार म्हणून नव्हे तर एक मुलगी म्हणून स्नेह दिल्याबद्दल मतदारसंघातील कुटुंबा समान जनतेची मी सदैव ऋणी राहील.आणि हे नातं कायम राहील अशी आशा आहे असेही त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
माझे आदर्श, माझे वडील स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी मला राष्ट्र पहिलं,नंतर आपण ही शिकवण दिली आहे.आजीवन याच मार्गावर मी चालेल अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते.माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण सदैव देश सेवेसाठी समर्पित राहील, अशा शब्दांत आपल्या भावनांना पूनम महाजन यांनी वाट मोकळी करुन दिली आहे.