घराबाहेर असल्यावर अनेक जण बाटलीबंद अर्थात मिनरल वॉटर पितात. मात्र, हेच बाटलीबंद पाणी विष ठरु शकते. कारण, एल लिटरच्या सीलबंद पाण्याच्या बाटलीत प्लास्टिकचे 2.4 लाख तुकडे आढळले आहेत. एका संशोधनादरम्यान ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोदन केले. अमेरिकेत विकल्या जाणार्या वेगवेगळ्या ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याचे परीक्षण कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी केली. संशोधनादरम्यान प्रत्येक बाटलीमध्ये 100 नॅनोमीटर प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. प्रत्येक लिटरमध्ये 1.1 ते 3.7 लाख नॅनोमीटर प्लास्टिक आढळून आले आहेत. तर, उर्वरित मायक्रोप्लास्टिक आहे. या बाटलीत आढलेल्या 2.4 लाख मायक्रोप्लास्टिक्सपैकी 90 टक्के नॅनोप्लास्टिक्स आहेत. प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये या संशोधनाचा खुलासा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
संशोधनात धक्कादायक खुलासा.. 1 लिटर बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे 2.4 लाख तुकडे..
- Advertisement -