हल्लीची तरुण पिढी काम धंदा, शिक्षणाकडे लक्ष न देता या नेत्यांच्या पुढे-मागे करण्यात आपला अमूल्य वेळ घालवताना दिसते. अशाच मुलांना या तरुणां चांगलाच टोला लगावला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण पुण्याच्या रस्त्यावर हातात एक पोस्टर धरुन उभा आहे. या तरुणाकडे येणारे जाणारे सगळे बघत आहे. कुणी थांबून पोस्टरवर काय लिहलं आहे हे सुद्धा वाचत आहे तर काहीजण या तरुणासोबत फोटो काढत आहेत.
या पोस्टरवर “आईबापाला घोटभर पाणी न देणारं पोरगं, नेत्याच्या वाढदिवसाला बाटलीभर रक्त देवून येतं.” असं लिहलं आहे. या वाक्यातून तरुणानं वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाचं सगळे कौतुक करत आहेत.