Tuesday, June 24, 2025

Rupali Ganguly :फेम अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, हाती घेतले कमळ….

अनुपमा फेम अभिनेत्री रूपाली गांगुलीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. रूपाली गांगुलीने हाती कमळ घेतल्याची माहिती मिळत आहे. तिने आज पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये रूपाली गांगुलीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई (या मालिकेतून अभिनेत्री रूपाली गागुंली समोर आली होती. आज रूपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.

रूपाली गांगुलीसोबत अमेय जोशी यांनीही आज भाजपमध्ये पक्षात प्रवेश केला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रूपाली गांगुली राजकारणात उतरली आहे. रुपाली ही सध्या अनुपमा या मालिकेत काम करत आहे. स्टार प्लसवरील ही मालिका सध्या खूप चर्चेमध्ये आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीचं वार वाहत आहे. अनेक अभिनेते , अभिनेत्री सध्या राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles