Wednesday, May 22, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी कार्यालयात कर्मचारी ‘एसिबीच्या’ जाळ्यात

आरोपी खाजगी इसम सागर नलवडे, खाजगी मदतनीस, तलाठी कार्यालय, कर्जत, ता. कर्जत,
जि. अहमदनगर याने ७,००० /- रुपये लाचेची मागणी केलेबाबत
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांचे कर्जत येथील गट नंबर १३४ / १ मधील संपूर्ण विहीर पाणी हिस्सा व दोन आर विहीरपड क्षेत्रात जाणे येणेचे हक्काबाबत तक्रारदार व त्यांच्या भावाने केलेल्या खरेदी खताची नोंद सात बारा उता-यावर लावण्यासाठी तलाठी, कर्जत यांच्या हाताखाली काम करणारे खाजगी इसम सागर नलवडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५००० /- रुपये लाचेची मागणी केले बाबतची तक्रार
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगरकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि. २८/०२/२०२४ रोजी पंचासमक्ष
लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी दरम्यान यातील खाजगी इसम सागर नलवडे यांनी तक्रारदार
यांचेकडे पंचासमक्ष तलाठी कर्जत यांचे करीता व स्वत: करीता ७०००/- रुपये लाच मागणी करुन ती लाच
रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शविली म्हणून त्यांचेविरुध्द कर्जत पोलीस स्टेशन गुरनं. ३१८ / २०२४ भ्रष्टाचार
प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७(अ) प्रमाणे दि.३०/०४/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
सदर कारवाई ही मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक
विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा. श्री. माधव रेडडी, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
नाशिक परिक्षेत्र, नाशिक व श्री नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
अहमदनगर, पोना. किशोर लाड, पोकॉ. रविंद्र निमसे, पोकों सचिन सुद्रुक, चालक पोहेकॉ दशरथ लाड यांचे पथकाने
केली आहे.
कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर
त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे
आवाहन पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles