शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय लवकरच लागण्याचा शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकीकडे ही चर्चा सुरु असताना आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या सुनावणीची देखील तारीख समोर आली आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकाल १० जानेवारीला लागणार आहे. बुधवारी ४ वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी चार वाजेनंतर निकालातील ठळक मुद्दे वाचले जाणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.