एकनाथ शिंदे गद्दार आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. ईशान्य मुंबई मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी चतुर्वेदी यांनी ‘एकनाथ शिंदे गद्दार हैं’ अशा घोषणा दिल्या. त्यांनी दिवार सिनेमाचा उल्लेख करत श्रीकांत शिंदेंवर टीका केली. ज्यानंतर आता एकनाथ शिंदे गटातील नेत्याने त्यांना उत्तर दिलं आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय, ‘मेरा बाप गद्दार हैं.’ प्रियांका चतुर्वेदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र या टीकेनंतर आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी तर मग आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार है असं लिहिलं पाहिजे असं म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या लोकांना किन्नर म्हणाले होते. अशा नामर्द, धोकेबाज लोकांबरोबर मी कधीच जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर जाऊन महागद्दारी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार है असं लिहिलं पाहिजे. जे नरेटिव्ह उबाठावाले जनतेत पसरवू पाहात आहेत ते चुकीचं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी आमदार त्यांनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या गद्दारीचा बदला घेतला.”