समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना घरात घुसून मारहाण, शासकीय वर्तुळात खळबळ

0
13

हिंगोलीमध्ये समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांना घरात घुसून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना काल ४ जूलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीमध्ये सहाय्यक आयुक्त गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हिंगोलीमध्ये समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दोन जणांनी मध्यरात्री शासकीय निवासस्थानात घुसून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मारहाणीमध्ये सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रकरणी हिंगोली शहर पोलीस स्थानकात आरोपी रवींद्र वाढे यांच्यासह आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान समाज कल्याण विभागात कंत्राटी पद्धतीने संगणक ऑपरेटर पद भरण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्रार्थामिक माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंगोलीमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचं दिसत आहे. शासकीय अधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस घडलेल्या प्रकाराची कसून चौकशी करत आहेत.