Monday, June 23, 2025

मोदी साहेब, तुमच्या कर्त्या नेत्याला समज द्या अन्यथा त्यांचा सुफडासाफ करू, जरांगे पाटलांचा इशारा…

मोदीसाहेब, महाराष्ट्रातील तुमच्या भाजपच्या कर्त्या नेत्याला थोडी समज दिली तर बरं होईल. नाही दिली तर फजिती होणारच आहे. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे. हे असंच सुरू राहिलं, तर विधानसभेला मी मैदानात आहेच. मराठ्यांचा द्वेष सोडून द्या, नाही तर आगामी काळात आम्ही मैदानात राहून त्यांचा पुरता सुफडासाफ केला जाईल, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते सोलापूर येथे माध्यमांशी बोलत होते.

आचारसंहिता उठल्यानंतर सगेसोयऱ्यांचा निर्णय घेतला नाही तर आम्ही विधानसभेला 288 लोक उतरवणार आहोत. त्यात मुस्लिम, धनगर, मराठा, बारा बलुतेदार, दलित, लिंगायत असणार आहेत. आम्ही एवढे सगळे एकत्र आलो, तर त्यांचा उलटा सुलटा कार्यक्रम झालाच म्हणून समजा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles