Tuesday, May 28, 2024

खा. सुजय विखे पाटील यांनी खरंच तुतारीला मत देण्यास सांगितले का… व्हिडिओ

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक साठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. लंके हे सध्या संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे.
अशातच मात्र सोशल मीडियामध्ये सध्या खा. सुजय विखे पाटील यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल केला जात आहे.त्यामुळे सध्या संपूर्ण नगरभर या व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.
खासदार सुजय विखे यांनी काय म्हटले आहे
शेवगाव विधानसभा मतदारसंघात देखील असाच एक मेळावा संपन्न झाला आहे. या मेळाव्याला शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा सरचिटणीस अरुण मुंडे असे विविध भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्यात सुजय विखे पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. यामध्ये खासदार महोदय यांनी, ‘भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून समाजात वावरत असताना आपण काय बोलतो याला फार महत्त्व आहे.

तुम्हाला याची जाणीव नसेल पण आपण जेवढ्या ताकतीने आपल्या नेत्याची बाजू मांडू, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू मांडू. आता प्रत्येकालाच सगळे मान्य आहेत का ? नाही. काही लोकांना सुजय विखे पाटील मान्य नसतील तर त्यांना मोदींचे नाव सांगा. काही लोकांना त्यांची अडचण असेल तर त्यांना माझं नाव सांगा. दोघांची अडचण असेल तर ताईंचे (आमदार मोनिकाताई राजळे) यांचे नाव सांगा. आमची तिघांची अडचण असेल तर अरुण मुंडे (भाजपा सरचिटणीस) यांचे नाव सांगा. आमच्या चौघांची अडचण असेल तर एखाद्या दुसऱ्याचं नाव सांगा. आमच्या सगळ्यांची अडचण असेल तर मग तुतारी वाजवून टाका,’ असे म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles