Saturday, May 18, 2024

अहमदनगर निवडणूक पथकाने हस्तगत केली १ लाख १९ हजारांची रक्कम

निवडणूक पथकाने हस्तगत केली १ लाख १९ हजारांची रक्कम

शिर्डी, दि.२९ एप्रिल २०२४ – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे निवडणूक भरारी पथकाने १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली.

शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पथकाने ही कारवाई केली आहे. नियमित तपासणी करत असताना नेवासा – श्रीरामपूर रोडवर नेवासाकडून श्रीरामपूर कडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकी गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते.

शिर्डी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी दंडाधिकारी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अमोल शरद लांडे, सोमनाथ तुळशीराम बलमे, व्हिडिओग्राफर समीर हमीद शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles