मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांचे निकटवर्तीय विद्यमान खासदार सय्यद जफर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सय्यद जफर यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भोपाळ येथील भाजप कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व दिले आहे. सय्यद जफर यांनी काही दिवसांपूर्वी सीएएच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट टाकून काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले होते.काँग्रेस खासदार सय्यद जफर हे छिंदवाडा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा मोठा चेहरा मानले जातात. कमलनाथ आणि नकुलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. परंतु एकामागून एक कॉंग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.