मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मदत संपली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिनिधी सभा घेण्यास अदयाप मुदत दिलेली नाही. तसेच, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावरही अद्याप निर्णय घेतला नाही. त्यावरून विरोधक उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. अशातच काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलता उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षप्रमुख पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
तुम्ही पंतप्रधान मोदी यांची माणसे असल्याचे सांगता. तर मग, बाळासाहेब यांचे फोटोला लावून का येता? मोदी असले तरी बाळासाहेब यांच्याशिवाय महाराष्ट्र्रात मत मिळू शकत नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळे निवडणुकीत समोर यायचे असेल तर मोदी यांचे फोटो लावून या, बघू हा महाराष्ट्र कुणाच्या बाजूने आहे असे आव्हान त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिले. तसेच, समोर उपस्थित शिवसैनिकाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मी पक्षप्रमुख म्हणून नको असेल तर ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्यादिवशी मी खाली उतरेन असे स्पष्ट केले.






