Tuesday, May 21, 2024

राज ठाकरेंच्या शिलेदाराला थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची ‘ऑफर’…

vasant more …पुणे: भोंग्यांच्या मुद्द्यावरून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहरप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर मोरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मोरे यांना राष्ट्रवादीनेही पक्षात येण्याची ऑफर दिलेली असतानाच थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. भेटायला या असा निरोपच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनबाबतची माहिती खुद्द वसंत मोरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसोबत माझं डायरेक्टली बोलणं झालं नाही. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरेंचा फोन आला होता. सीएमचा माझ्यासाठी फोन आहे म्हणून सांगत होते. त्यावेळी मी नेमका कात्रजमध्ये नव्हतो. मी सर्वांना सांगितलं मी अजून मनसेत आहे. माझा पदभार मी साईनाथ बाबर यांच्याकडे दिला आहे. पण मी मनसेतच आहे. मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला या म्हणून मला निरोप दिला आहे. मुख्यमंत्र्याचा आणि इतरांचेही फोन आले, असं मोरे यांनी सांगितलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles