Tuesday, May 21, 2024

एटीएममधून आता कार्डशिवायही पैसे काढता येणार, रिझर्व्ह बँकेची घोषणा

ATM ..नवी दिल्ली : एटीएममधून आता एटीएम कार्डशिवायही पैसे काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली आहे. आतापर्यंत ही सुविधा काही बँकांमध्येच उपलब्ध होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आता डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये दिली जाईल. आतापर्यंत फक्त काही बँकांमध्ये कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा होती. तसेच, यूपीआयच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतात, असेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे कार्ड क्लोन करून पैसे काढण्याची फसवणूकही कमी होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण जाहीर केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles