एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये हा तरुण चक्क इस्त्रीवर ऑम्लेट बनवताना दिसत आहे. गॅस नाही म्हणून इस्त्रीवर ऑम्लेट बनवण्याचा हा जुगाड सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या तरुणाने टेबलावर इस्त्री ठेवली आहे आणि इस्त्रीची तळपट्टी वरच्या दिशेने केली आहे. इस्त्री गरम झाल्यानंतर तरुणाने अंडं फोडून इस्त्रीच्या गरम तळपट्टीवर टाकले. इस्त्रीवर ऑम्लेट बनवताना हा तरुण व्हिडीओत दिसत आहे.
अगदी तव्यावर जसं बनवतो, तसे ऑम्लेट त्याने इस्त्रीवर बनवले आहे