Video लालबागचा राजा…भाविकांमध्ये दोन वर्ग….एकाला आरामात दर्शन तर दुसऱ्या वर्गाचे हाल..

0
54

आता लालगाबच्या राजाच्या दरबारातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या लोकांना राजाचे चरणस्पर्श करायचे असेल त्यांच्यासाठी वेगळ्या रांगेची तरतूद केली जाते. या रांगेत लोक तासनतास उभे राहून बाप्पााच्या दर्शनाची वाट पाहत असतात. अशातच काही मंडळी थेट बाप्पाापर्यंत पोहचतात, हे एवढ्यावरच थांबत नाही तर तिथे जाऊन बाप्पााजवळ उभं राहून फोटो काढण्याचाही त्यांचा हट्ट असतो. लालबागच्या राजाचे दोन पाय आणि दोन पायांवर दोन वेगळे वर्ग. एक वर्ग श्रीमंतांचा किंवा ओळखीने आलेला तर दुसरा वर्ग सर्व सामान्यांचा, जे तासनतास रांगेत उभे राहून तिथपर्यंत पोहचलेले असतात. यावेळी दोघांना वेगळी वागणूक दिल्याचं पाहायला मिळालं. https://x.com/dr_prashantsb/status/1834282911480381902