चालताना फुटपाथचा वापर करा, रस्त्यावर चालू नका अशा सूचना वारंवार केल्या जातात. पण हे काका सूचनांकडे दुर्लक्ष करत रस्त्यावर चालताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती रस्त्यावर चालत आहे. व पाठीमागून एक बस येतेय. बरं, या बसच्या चालकानं हॉर्न वगैरे मारून काकांना बाजूला होण्याची सूचना केली. पण त्यांनी पाठीमागे नजर मारून या सूचनेकडे दुर्लक्ष केलं. आणि शेवटी जणू त्यांनी आपल्या हातांनी बस रोखली. लक्षवेधी बाब म्हणजे बस थांबताच प्रवासी खाली उतरले आणि ती बस पुन्हा एकदा पुढच्या स्टॉपच्या दिशेनं पुढे जाऊ लागली. पण ते काका काही ऐकायला तयारच नाहीत. ते बससमोर चालतच राहिले. आणि बस सुद्धा हळूहळू पाठिमागून चालत राहिली. हा व्हिडीओ viralinmaharashtra या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.






