विनायकनगर मातोश्री उद्यान रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
नियोजनबद्ध विकास कामातून बदलत्या नगर शहराची निर्मिती करू – आमदार संग्राम जगताप
नगर : शहरामध्ये सामाजिक कार्यक्रमासाठी फिरत असताना शहर विकासाची संकल्पना कळत असते, आमची टीम शहर विकासाच्या विचाराची आहे, मनुष्याला वैचारिक पातळीची गरज असणे गरजेचे आहे, त्यातून व्हिजन देऊन विकासाचे काम होत असते, पहिल्या टप्प्यातील बहुतांश रस्त्याची कामे मार्गी लावली आहे, आता दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याची कामे सुरू होणार असून येत्या डिसेंबर जानेवारीपर्यंत शहरातील बहुतांश रस्त्याची कामे मार्गी लागली जाणार आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, दर्जेदार नियोजनबद्ध विकासाची कामे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, त्यामुळे विकसित शहरासाठी आवश्यक असणारी कामे मार्गी लागले जातील, माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी बुरुडगाव रोड परिसरामध्ये कायमस्वरूपी असणारी विकास कामे मार्गी लावली आहे, याच धर्तीवर संपूर्ण शहरात कामे सुरू आहेत, नियोजनबद्ध विकास कामातून बदलत्या नगर शहराची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून व माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पाठपुराव्यातून विनायकनगर मातोश्री उद्यान रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी जो काही निधी मिळाला आहे तो आमदार संग्राम जगताप यांनी उपलब्ध करून दिला आहे, विकास कामे करीत असताना नागरिकांना बरोबर घेतले जाते, आम्ही गोड गोड बोलणारे लोक नसून कृतीतून काम दाखवणारे लोक आहेत. गोड बोलण्यातून तेवढ्यापुरते मनाला छान वाटते मात्र विकासाचे काम मार्गी लागत नाही, सारसनगर मधील प्रत्येक भागामध्ये रस्त्याची कामे सुरू असून जवळपास सर्वच कामे मार्गी लागणार आहे, त्यानंतर आम्हाला प्रश्न पडणार आहे की आता विकासाची कामे कुठे करायची ५० वर्षात कधी मनपाचे आरोग्याच्या दृष्टीने हॉस्पिटल नव्हते, कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल होते पण ते पण दान आहे आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे शहराच्या मालकीचे सुसज्ज असे पाच मजली हॉस्पिटल निर्माण झाले आहे, त्यातून आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना मोफत सुविधा उपलब्ध होतील, नियोजनबद्ध विकास कामांमुळे कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लागला जात असल्याचे मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले
आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून गणेश भोसले यांना उपमहापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली मात्र त्यांनी त्या पदाला कामाच्या माध्यमातून न्याय दिला आहे, उपमहापौर पदाला कुठलाही अधिकार नसताना देखील त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून चांगली कामे उभी केली आहे यापूर्वी कधीही मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत नव्हती, आता सर्वच भागात मूलभूत प्रश्नांपासून ते चौक सुशोभीकरण आरोग्य, क्रीडा, रस्ते, आदीबाबतची कामे सुरू असल्याचे मत माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन विजय फुलसौंदर यांनी मानले