Saturday, December 7, 2024

इंस्टाग्रामवर महिलेला ओळख भोवली….नगरमधील महिलेवर पुण्यात अत्याचार, आरोपी अटकेत

अहमदनगर : इंस्टाग्रामवरून ओळख करत अहमदनगर शहरात बोलावून घेत एका विवाहितेवर लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमीर हसन शेख (रा. शिक्रापूर, जि. पुणे) यास कोतवाली पोलिसांनी शिक्रापूर येथून शुक्रवारी अटक केली.

पीडित महिलेशी आरोपीने इंस्टाग्रामवरून ओळख वाढविली. त्याने २८ डिसेंबर रोजी पीडितेला अहमदनगर शहरातील पुणे बसस्थानक येथे भेटण्यासाठी बोलविले. पीडित बसस्थानक महिलाही मुलासह परिसरात आली. आपण कुठे तरी निवांत बसून बोलू, असे म्हणत आरोपीने पीडितेलाबसविले. तेथून तो पीडित महिलेला दुचाकीवर घेऊन शहरातील एका लॉजवर गेला. लॉजवर पोहोचल्यानंतर मारहाण करत पीडितेवर अत्याचार केला.

त्यानंतर पीडितेने फोनवरून आरोपीला विचारणा केली असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यास शिक्रापूर येथून अटक केली असून, कोतवाली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, शीतल मुगडे, तनवीर शेख, ज्ञानेश्वर मोरे, दीपक रोहकले, तान्हाजी
पवार आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles