Thursday, May 9, 2024

जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या स्वच्छता रथाला मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद

जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या स्वच्छता रथाला मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद…

अहमदनगर :- आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पाणी व स्वच्छता विभाग यांच्या वतीने जिल्हयातील गावांमध्ये पाणी व स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात येत असून गावातील गावकऱ्यांच्या वतीने रथाचे स्वागत करून उस्फुर्त पणे सहभागी होत आहे अशी माहीती संभाजी लांगोरे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पाणी व स्वच्छता विभाग नेहमी लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळया प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून जिल्हयातील
ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन,हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) जल जिवन मिशन शुध्द पाण्याची उपलब्धता, वैयक्तीक स्वच्छता,परिसर स्वच्छता,गावाची स्वच्छता,घर व अन्न पदार्थाचे स्वच्छता,सांडपाण्याची व्यवस्था घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन,मानवी विष्टेचे व्यवस्थापन (वैयक्तिक शौचालय) सार्वजनिक शौचालय तसेच जल जीवन मिशनच्या अनुषंगाने सदर स्वच्छता रथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

स्वच्छता रथाच्या माध्यमातून जिल्हयात स्वच्छ भारत मिशन, टप्पा-2 व जल जीवन मिशन च्या विविधि घटकांची प्रचार प्रसिध्दी होत असून सर्व सामान्य नागरिकापर्यंत योजनां ची माहीती दिली जात असून त्या द्वारे जन जागृती केली जात आहे असे सुरेश शिंदे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन यांनी सांगितले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles