Tuesday, May 21, 2024

ईडीच्या कारवाई नंतर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सोशल मिडिया पोस्ट…. म्हणाले

नगर: ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीने कारवाई केली आहे.‌या कारवाई मुळे तनपुरे समर्थक अस्वस्थ झाले असताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री तनपुरे यांनी म्हटलं आहे की,
आमदार व राज्यमंत्री झाल्यापासून माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण माझ्या राहुरी मतदारसंघातील, नगर जिल्ह्यातील व राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या, वेदनेच्या सोडवणुकीसाठी अत्यंत प्रामाणिक भावनेने जगलो आहे.

सर्वसामान्यांचे, गोरगरीब जनतेचे अश्रू पुसताना कधीही जात पात, धर्म, राजकीय भुमिका या गोष्टी बघितल्या नाही. दिवसरात्र एक करून काम करत राहिलो. कितीही अडचणी आल्या तरी सर्वसामान्य जनतेप्रति सेवेच्या या व्रतात खंड पडणार नाही.

ही शिकवण आदरणीय शरद पवार साहेबांनी दिली आहे. साहेब, आपण ज्या विश्वासाने मला जबाबदारी दिली आहे, त्यास कधीही तडा जाऊ देणार नाही🙏

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles