Tuesday, May 14, 2024

कर्जत जामखेड मतदारसंघातील गावांच्या पाणी योजनांना कार्यारंभ आदेश

मुंबई: कर्जत-जामखेड मतदारसंघातील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

यावेळी आमदार रोहित पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या कर्जत व जामखेडमधील सर्व गावांसाठी लवकरच योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन कार्यारंभ आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी श्री. पाटील यांनी दिले. कर्जत जामखेड मतदारसंघात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व गावांतील पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन कार्यारंभ आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles