Tuesday, May 14, 2024

पाथर्डी शेवगाव तालुक्यातील पाणी योजनांबाबत महत्वपूर्ण निर्णय, आ.राजळेंच्या प्रयत्नांतून बैठक

मुंबई, : पाथर्डी व शेवगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांबाबत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी आमदार श्रीमती मोनिका राजळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पाण्याचे दुर्भिक्ष्य विचारात घेता भगवानगड परिसरातील 46 गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून या योजनेला मंजुरी देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. हातगाव व इतर 28 गावांसाठीच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत केवळ 5 गावांनीच योजनेच्या सुधारणात्मक पुनर्जोडणीसाठी सहभागी होण्यास सहमती दर्शवली असून उर्वरीत 24 गावांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी आमदार श्रीमती राजळे यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील 46 गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्राधान्याने मंजूर करण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे. मिरी-तिसगाव व इतर 33 गावे, बोधेगाव व इतर 7 गावे, अमरापूर-माळी बाभूळगाव व इतर 49 गावे आणि शहर टाकळी व इतर 24 गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवण्याबाबत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही श्री. पाटील यांनी दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles