Thursday, May 9, 2024

जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम – संभाजी लांगोरे

पाण्याचे महत्त्व व बचतीच्या जनजागृतीसाठी…

जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम
– संभाजी लांगोरे मुख्य कार्यकारी अधिकारी

अहमदनगर
ग्रामीण भागामध्ये पाण्याचे महत्व, वापर हाताळणी व पाण्याची बचत आदी याबाबत जनजागृती व्हावी या करीता दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगळवार दि.२२ मार्च २०२२ रोजी जागतिक दिनानिमित्त जल जीवन मिशन अंतर्गत तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जागतिक जलदिनानिमित्त जल जागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी दिली.
जागतिक जलदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत स्तरावर ,शालेय विद्यार्थ्यांची, जल व स्वच्छता प्रभात फेरी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची परिसर स्वच्छता , स्त्रोतांचे क्लोरिनेशन, प्रात्यक्षिक दाखवणे, पाण्याच्या टाकीची स्वच्छता करणे, जल जीवन मिशन अंतर्गत गावातील घरोघरी नळाद्वारे प्रतिव्यक्ती , प्रतिदिन ५५ लिटर पिण्याचे शुध्द पाणी मिळेल यादृष्टीकोनातून ग्रामस्थांच्या सहकार्याने नियोजन करण्यात आले असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी सांगितले.
शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पिण्याच्या पाण्याची जागेची स्वच्छता करणे, पाऊस पाणी संकलन तसेच पाण्याचा साठा वाढविण्यासाठी गाव परिसरात पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविणे याबाबत प्रभावीपणे जनजागृतीसाठी जलप्रतिज्ञा घेण्यासाठी ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प संचालक जनजीवन मशीन सुरेश शिंदे व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles