Saturday, May 18, 2024

टेम्पोला लागलेल्या आगीत बारावीच्या प्रश्नपत्रिका भस्मसात…आता परीक्षेबाबत बोर्डाकडून मोठा खुलासा

पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात धावत्या ट्रकला आग लागली. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्या जळून खाक झाल्या आहेत. पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ‘परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे चार मार्चपासून सुरू होईल, यात काहीही अडचण येणार नाही,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

हा अपघात बुधवारी पहाटे झाला. मध्य प्रदेशातून पुणे विभागीय मंडळाचे छापील साहित्य घेऊन येणाऱ्या ट्रकला पाठीमागील बाजूने आग लागली. हे लक्षात आल्यानंतर चालक व त्याच्या सहायकाने ट्रक थांबवून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. संगमनेरमधील अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वाहनात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची गोपनीय कागदपत्रे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानुसार पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अशोक भोसले, विभागीय सचिव अनुराधा ओक, सहायक सचिव पोपट महाजन यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. जळालेल्या कागदपत्रांमध्ये बारावीच्या चार मार्च रोजी होणाऱ्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका असल्याचे सांगण्यात आले. या माहितीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मध्य प्रदेशातून हे साहित्य छापून आणण्यात येत होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles