Saturday, May 18, 2024

प्रथम नगराध्यक्ष गुलाबराव कदम यांचे निधन

नगर: देवळाली प्रवरा नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष व डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक, देवळाली प्रवरा येथील ज्येष्ठनेते गुलाबराव बाबुराव कदम (वय 77) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सून, नातवंडे, असा परिवार आहे.
सन 1983 साली देवळाली प्रवरा नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर शहराचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान कै. गुलाबराव कदम यांना मिळाला होता. त्यांच्या कार्यकाळात शहरात विकासात्मक कामाची पायाभरणी झाली. अत्यंत मितभाषी, नम्र स्वभाव आणि कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी ठरली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles