Saturday, May 18, 2024

‘दादा येता का मदतीला?’ आ.रोहित पवारांनी लगेचच ज्वारी काढण्यास केली मदत

मुंबई : आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहे. यादरम्यान ज्वारीची काढणी करणाऱ्या एका महिलेने ‘दादा येता का मदतीला?’ असे म्हणत रोहित पवार यांना ज्वारी काढणीसाठी बोलावले. यानंतर त्यांनी शेतात जाऊन ज्वारी काढण्यासाठी त्या महिलेला मदत केली. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.
FMNLKo7VkAAs4wX
रोहित पवार म्हणाले, “सध्या ज्वारीची काढणी सुरू आहे. मतदारसंघात असताना ज्वारी काढण्यासाठी जात असलेल्या एका भगिनीची रस्त्यात भेट झाली असता, ‘दादा येता का मदतीला?’ असे हक्काने विचारले आणि मीही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही वेळ ज्वारी काढण्यास त्यांना मदत केली.”, याचबरोबर, दुसरे ट्विट करत शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी अजूनही अनेक कामे माणसांनाच करावी लागतात. यातलंच एक काम म्हणजे ज्वारीची काढणी! त्यासाठी किती कष्ट करावे लागतात याचाही अनुभव यावेळी आला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles