Saturday, May 18, 2024

नगर जिल्ह्यातील ‘या’ गावात झाला दारूबंदीचा ठराव

खोसपुरी गावात झाला दारूबंदीचा ठराव
ग्रामस्थांमध्ये समाधान ; पोलिसांकडून कारवाईचा इशारा
नगर तालुका- नगर तालुक्यातील खोसपुरी गावामधील ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव घेतला असून या निर्णयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खोसपुरी ग्रामसभेत सर्वानुमते दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. दारूबंदीच्या ठरावाची सुचना अविनाश आव्हाड यांनी मांडली तर त्यास अनुमोदन नसीबाबी पठाण यांनी दिले. खोसपुरी गावाने घेतलेल्या दारूबंदीच्या ठरावामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
ग्रामसभेतील दारूबंदीच्या ठरावाची नक्कल एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना देण्यात आली आहे. गावात दारूबंदी करण्याबाबत महिलांनी विशेष आग्रह धरला होता. खोसपुरी गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू असल्याचे ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे. गावातील दारूबंदी होणे गरजेचे आहे. दारुमुळे तरुणवर्ग व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे गावात दारूबंदीचा ठराव घेण्यात आला.
खोसपुरी गावाने अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेतल्याने परिसरातील गावांनी देखील खोसपुरी ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. खोसपुरी गावचा आदर्श इतर गावांनी घेण्याची गरज आहे. ठरावावर सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या आहेत.
एम.आय.डि.सी. पोलीस स्टेशनला निवेदन देताना सरपंच मुबारकभाई पठाण, उपसरपंच प्रशांत भालेराव, ग्रामपंचायत सदस्य करीमभाई बेग, अविनाश आव्हाड, कय्युम शेख, गणेश भिसे, तंटामुक्त समिती अध्यक्ष हरिभाऊ हारेर, सामाजिक कार्यकर्ते अस्लमभाई बेग उपस्थित होते.

दारूबंदी हा गाव हिताचा निर्णय
खोसपुरी ग्रामस्थांनी गावात दारूबंदी करण्याचा ठराव घेतला. त्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. दारूबंदीचा निर्णय हा गाव हितासाठीच असून सर्व ग्रामस्थांनी दारूबंदी ची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे.
…. मुबारकभाई पठाण ( सरपंच खोसपुरी)

कडक कारवाई करणार
खोसपुरी गावात ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला आहे. गावामध्ये अवैध दारू विक्री अथवा अवैध धंदे करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. दारूबंदीसाठी सर्व ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे.
युवराज आठरे (सहा. पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles