Saturday, May 18, 2024

भाजपला दणका…विद्यमान उपमहापौरांसह नगरसेवक बांधणार ‘शिवबंधन’

शिवसेनेने भाजपला एक मोठा झटका दिला आहे. भाजपच्या उपमहापौरांसह चार नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. नाशिक महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. यामध्ये विद्यमान उपमहापौर भिकुबाई बागुल यांचाही समावेश आहे. हे सर्व नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून आपल्या हाती शिवबंधन बांधणार आहेत. प्रथमेश गीते हे माजी उपमहापौर आहेत. प्रथमेश गीते हे वसंत गीते यांचे पुत्र आहेत. वसंत गीते हे शिवसेनेत आहेत मात्र, त्यांचे पुत्र प्रथमेश गीते हे भाजपचे नगरसेवक आहेत. पण आता प्रथमश गीते हे भाजपला रामराम करत शिवबंधन आपल्या हाती बांधणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles