Saturday, May 18, 2024

त्यांच्या दहशतीला जनता आता मतपेटीतून उत्तर देईल, माजी मंत्री राम शिंदे यांचा पवारांवर हल्लाबोल

नगर: आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. मिरजगाव येथे झालेल्या बैठकीत शिंदे यांनी आ.रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
अहमदनगर – करमाळा महामार्गाच्या कामासाठी भारतीय जनता पार्टी सत्तेत असलेल्या केंद्राचा निधी असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माझ्यासाहित नगर दक्षिणचे खासदार डाँक्टर सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला. तसेच कर्जत तालुका भाजपा यांच्या मिरजगाव येथील आंदोलनामुळे गती मिळून महामार्ग आता प्रगतीवर आहे. परंतु फोटो सेशन आणि सोशल मीडियात केला जाणारा भ्रम आता जनतेच्या लक्षात येत आहे. गेली अडीच वर्षात मोठं काम सांगायला नसल्याने ते आता जनतेचा भुलभुलैय्या करीत आहेत. आपण मंजूर केलेल्या मिरजगाव पाणीपुरवठा योजनेच ही तांत्रिक कारण घेऊन श्रेय घेण्याचा घाट चालू आहे. मात्र जनता आता हुशार झाली आहे आणि ती आता दहशतीमुळे जि. प.व पंचायत समिती निवडणुकीत मतपेटीतच व्यक्त होईल असे माजी मंत्री राम शिंदे यांनी म्हटले. यावेळी डाँक्टर झरकर बाबा , श्री.हरिदास केदारी , श्री.संपत बावडकर सर ,श्री.अभिजित जवादे ,श्री.कैलास बोरुडे ,दादा घोडेस्वार यांची भाषणे झाली यावेळी श्री.शेखर खरमरे , श्री.तात्या खेडकर ,श्री.पंडा बोरुडे , श्री.पप्पू शेट धोदाड ,श्री.विठ्ठल अनुभुले श्री. लहू ओतारे , श्री.सारंग घोडेस्वार व सर्व मान्यवर उपस्थित होते.
सचिन पोटरे- जिल्हा सरचिटणीस भाजपा अहमदनगर दक्षिण.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles