Tuesday, May 14, 2024

महिला डॉक्टरची लॉजमध्ये आत्महत्या

महिला डॉक्टरची लॉजमध्ये आत्महत्या,
नांदेड : महिला डॉक्टरने लॉजमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकरची रहिवासी असलेल्या महिला डॉक्टरने नांदेड शहरातील पंजाब लॉजमध्ये आयुष्याची अखेर केली. विद्या अमोल सुंकवाड असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. लॉजमधील रुमचा दरवाजा बराच वेळ न उघडल्यामुळे व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावलं, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

विद्या सुंकवाड यांनी 22 मार्च रोजी नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पंजाब लॉजमध्ये एक रुम बुक केली होती. 23 मार्च रोजी सकाळी त्या उठून बाहेर गेल्या आणि पुन्हा आपल्या रुमवर परत आल्या. मात्र 24 मार्च रोजी सकाळी त्या बाहेर न आल्यामुळे लॉजच्या व्यवस्थापनाने दार वाजवले, तेव्हा आतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles