Wednesday, May 15, 2024

रोटरी सेंट्रलतर्फे रविवारी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानतीर्थ स्कूल येथे विविध स्पर्धांचे आयोजन

मोफत बससेवेची सुविधा, विजेत्यांना रोख बक्षिसांसह सन्मानचिन्ह
नगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व शिराढोण येथील ज्ञानतीर्थ इंटरनॅशनल स्कूल ऍण्ड ज्यु.कॉलेजच्यावतीने रविवार दि.27 मार्च रोजी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व व प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रत्येक गटासाठी स्वतंत्र रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह तसेच प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍यांसाठी दिल्लीगेट तसेच केडगाव येथून मोफत बससेवेची व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी दिली.

रविवारी सकाळी 10.30 ते 12.30 यावेळेत इयत्ता 9 वी ते 12 वी गटासाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. यात निसर्ग चित्र, कोविड 19, माझी आदर्श व्यक्तीरेखा, शाळा सुरु असताना हे विषय असतील. विद्यार्थ्यांनी रंग तसेच इतर आवश्यक साहित्य स्वत: आणायचे आहेत. निबंध स्पर्धा सकाळी 9 ते 10 यावेळेत होईल. यासाठी महिलांचे आजच्या समाजातील स्थान, करोनामुळे झालेले बदल, ऑनलाईन शिक्षणाचे फायदे तोटे, शाळा बंद झाल्या तर असे विषय आहेत. सकाळी 10 वाजता वक्तृत्त्व स्पर्धा होतील. यात महागाईचा भस्मासूर, करोना एक महामारी, मी शिवाजीराजे बोलतोय, जागतिक युध्द आणि शांतता हे विषय असतील. दुपारी 2 नंतर इयत्ता आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा होतील. प्रत्येक गटात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 1001, 701, 501 रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थसाठी 301 रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेची अधिक माहिती, मोफत बससेवा व नाव नोंदणीसाठी संपर्क – 8741060610, 9284932004, 8888032597.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles