Wednesday, May 15, 2024

वाढदिवस विशेष….दिलखुलास, दिलदार….आ.अरूणकाका जगताप

आमदार अरूणकाका जगताप यांचा वाढदिवस दि.25 मार्च रोजी साजरा होत आहे. विकासाची दूरदृष्टी असलेले आणि नगर शहराप्रती प्रचंड आत्मियता असलेले आ.जगताप हे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखले जातात. अतिशय दिलखुलास स्वभावाच्या आ.जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख…

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात व आपल्याला खराखुरा आधार, परीस स्पर्श लाभतो. आ.अरूणकाका जगताप हे आमचे कौटुंबिक स्नेही असेच दिलदार व समोरच्याला आपलेसे करणारे व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या प्रचंड अभ्यासाचे, नगरच्या विकासाप्रती त्यांची असलेली तळमळ, उद्योगधंदे वाढून शहरात रोजगार निर्मितीला चालना मिळावी यासाठी ते खूप प्रयत्न करतात. आमच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांचा विशेष स्नेह आहे. वैयक्तिक सुखदु:खात ते आवर्जून सहभागी होतात. अडीअडचणीत त्यांच्यासारखा पाठिराखा असणे आम्हाला कायम मोठा आधार देते. जुने नातेसंबंध जोपासण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यात आहे.
बांधकाम व्यवसायात काम करताना शहरात नवनवीन प्रोजेक्ट उभारावे, शहराची एक वेगळी ओळख व्हावी. पुणे,मुंबई सारख्या महानगरांप्रमाणे इमारती, व्यापारी संकुल शहरात उभारावीत यासाठी ते नेहमी आग्रही असतात. सावेडी रस्त्यावर साकारत असलेल्या लक्झुरियस महावीर ग्रुप प्रकल्पासाठी त्यांचे वेळोवेळी अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. नगरमध्ये एक अतिशय सुंदर प्रकल्प साकारत असल्याने ते नेहमीच आनंद व्यक्त करतात.
वारकरी संप्रदायाचा मोठा पगडा असलेल्या कुटुंबातून पुढे येत त्यांनी समाजकारण, राजकारण केले आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतानाच ते समाजाला विशेषत: तरूणाईला नेहमीच विधायकतेचा मंत्र देतात. युवकांनी निर्व्यसनी राहून उत्कर्ष साधावा, आई वडीलांची सेवा करावी. अध्यात्म व धार्मिकता हेच मनुष्याला सुखी व आनंदी बनवतात. त्यामुळे प्रत्येकाने धार्मिकतेकडे वळावे, समाजासाठी नेहमीच चांगले काम करीत रहावे असा सल्ला ते आवर्जून देतात. नगरच्या समाजकारणात व राजकारणात त्यांनी उमटवलेला ठसा सर्वांनाच परिचित आहे. नगराध्यक्षपद भूषवताना त्यांनी अनेक चांगले निर्णय घेवून शहराच्या विकासाला चालना दिली. विधानपरिषेदेच सदस्य म्हणून सलग दोन वेळा विजय मिळवत त्यांनी आमदारकीच्या माध्यमातूनही अनेक विकासकामे मार्गी लावली. आयुर्वेद सेवा मंडळासारख्या प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्षपदही ते भूषवत आहेत. कोविड काळात त्यांनी आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करुन अनेक रूग्णांची चांगली सोय केली. समाजाच्या कोणत्याही कार्यात त्यांचा उत्साही सहभाग असतो. त्यांच्या सहवासात आल्यावर प्रत्येक वेळी कोणती ना कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळते. अतिशय लोकप्रिय व समाजाला कृतीतून दिशा देणार्‍या आ.अरूणकाका जगताप यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना व शुभेच्छा!
-राजेश संतोषजी भंडारी (टाकळी ढोकेश्वर)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles