Tuesday, May 21, 2024

शेवगाव तालुक्यात बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला धक्का…. सोसायटी निवडणुकीत मोठा पराभव

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग ज्ञानेश्वर शेतकरी मंडळ पॅनलचे वर्चस्व
देवटाकळी सोसायटी निवडणुकीत ज्ञानेश्वर शेतकरी मंडळ पॅनलचे वर्चस्व
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
शेवगाव प्रतिनिधी दि.(२८) शेवगाव तालुक्यातील मौजे देवटाकळी वि.का.से.सोसायटीचा नुकताच निकाल लागला आहे. यामध्ये ज्ञानेश्वर शेतकरी मंडळ पॅनलने सर्व जागेवर आपले वर्चस्व संपादित केले असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे.
मौजे देवटाकळी वि.का.से.सोसायटीची निवडणूक रविवार दि.२७ रोजी पार पडली. सदर निवडणुकीचा आज दि.२८ रोजी निकाल लागला असून या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर शेतकरी मंडळ पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले आहेत. जि.प.तथा नियोजन मंडळ सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी या विजयी उमेदवारांना तसेच या निवडणुकीत ज्यांनी आपले मोलाचे योगदान दिले अशा सर्वच ग्रामस्थांना पेढे भरवत कौतुक केले व जनशक्ती विकास आघाडी परिवाराकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर ज्ञानेश्वर शेतकरी मंडळ पॅनलच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. यावेळी श्रीराम खरड, संतोष खरड, बाळासाहेब खरड, बाबुराव राख, देविदास शिरसाठ, ज्ञानेश्वर खरड, भाऊसाहेब खरड, हरीश खरड, मुस्साभाई शेख, सतीश खरड, रविंद्र खरड, संभाजी जाधव, अनिकेत खरड, शामराव चिकणे, भगवान ठोंबळ, बबलू खरड, पंजक खरड, संतोष चिकणे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles