Friday, May 17, 2024

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 20 उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात…

38 शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 31 उमेदवारांचे 40 उमेदवारी अर्ज दि.25 एप्रिल 2024 पयर्र्ंत या शेवटच्या तारखेपयर्र्ंत प्राप्त झाले होेते. दि.26 एप्रिल 2024 रोजी झालेल्या छाननीत 22 उमेदवार वैधरित्या उमेदवार जाहीर करण्यात आले. दि.29 एप्रिल 2024 ला दुपारी 3 वाजेपयर्र्ंत दोघा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याबाबतची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर केल्याने 20 उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी अंतिम करण्यात येऊन त्यांना दुपारी 3 वाजेनंतर लगेच निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणूक लढविणार्‍या 20 उमेदवारांची यादी निवडणूक अधिकार्‍याने जाहीर केली. ते उमेदवार याप्रमाणे ः भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे), सदाशिव किसन लोेंखडे (शिवसेना), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), उत्कर्षा प्रेमानंद रुपवते (वंचित बहुजन आघाडी), राजेेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), अपक्ष – गोरक्ष तान्हाजी बागुल, अ‍ॅड. सिद्धार्थ दीपक बोधक, अशोक रामचंद्र आल्हाट, सतिष भिवा पवार, संजय पोपट भालेराव, गंगाधर राजाराम कदम, भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे, प्रशांत वसंत निकम, नचिकेत रघुनाथ खरात, रविंद्र कलय्या स्वामी, चंद्रकांत संभाजी दोेंदे, अभिजीत अशोकराव पोटे, विजयकुमार गोविंदराव खाजेकर आदि.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles