Monday, May 20, 2024

अजित पवार म्हणाले, उध्दव ठाकरे सरकार जात असताना शरद पवारांच्या सांगण्यावरून अमित शाह यांच्याशी चर्चा, तनपुरेंचेही घेतले नाव…

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठी विधानं केली. अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंचे सरकार जात होतं तेव्हा शरद पवारांना पत्र दिलं होते. जयंत पाटील, जितेद्र आव्हाड, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे या सर्वांनी सह्या केल्या होत्य. राजेश टोपेच पत्र घेऊन गेले होते. साहेबांनी मला सांगितलं अमित भाईंशी चर्चा करा. नंतर परत निरोप आला की, अशी चर्चा फोनवर होत नाही. कारण तुमचा मागचा अनुभव चांगला नाही. मागे पाठिंबा न मागताही तुम्ही पाठिंबा दिला होता, मग ती चर्चा रद्द झाली.पवारांनी असं का केलं ? याचं कारण तुम्ही सांगू शकता का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, याबद्दल आपल्याला माहिती नाही. 2014 मध्ये राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल येण्यापूर्वीच भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. काही दिवसांनी सरकारमध्ये जायचं असल्याचं सांगितलं गेलं, परंतु, कुठं काय खटकलं माहिती नाही. 2014 साली शिवसेनेला बाहेर काढायचं आणि आम्हाला आत घ्यायचं असा प्रस्ताव आमच्या वरिष्ठांनी दिला होता. पण भाजपनं नकार दिला होता कारण एवढ्या वर्षाची आमची मैत्री आहे कोणत्या कारणावरून बाहेर काढायचं ज्यांना सत्तेतून बाहेर काढायचं होतं त्यांच्या सोबत 2019 ला सत्तेत गेले याचा साक्षीदार मी आहे प्रफुल्ल पटेल आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles