Saturday, April 27, 2024

अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश, म्हणाला एकनाथ शिंदेंच्या कृपेने मी …

जय महाराष्ट्र. मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. या दिवशी मी शिवसेनेत प्रवेश केला. मी २००४ ते २००९ मध्ये सुरुवातीला राजकारणात असताना, बाहेर पडल्यावर वाटलं होतं की मी पुन्हा कदाचित राजकारणात दिसणार नाही. परंतु, १४ वर्षांच्या वनवासानंतर मी पुन्हा सुरुवात करत आहे. एकनाथ शिंदेंच्या कृपेने मी पुन्हा या पक्षात आलो आहे. मी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, अभिनेता गोविंदा आहुजा पक्ष प्रवेशावेळी म्हणाले.

अभिनेता गोविंदा आहुजा याआधी काँग्रेस पक्षाचा खासदार देखील राहिला आहे. तो लोकसभा निवडणूक याआधी निवडून आलाय. त्यानंतर तो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्याला मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांचं आज शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. सगळ्यांना आवडणारे, सर्व समाजांत लोकप्रिय असलेले गोविंदा यांचे मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाच्या पक्षप्रवेशावेळी म्हणाले.
माजी खासदार गोविंदा यांनी आज, गुरुवारी (२८मार्च,२०२४ ) शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. शिंदे यांनीही गोविंदा यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. तर मला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, असा विश्वास गोविंदा यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles