Saturday, May 18, 2024

रिपाइं गवई गट खा.विखेंना व्यक्तिगत साथ देणार, भाजपला नाही…

नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की, आरपीआय (गवई) चे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांच्या आदेशाने पक्ष न पाहता व्यक्ती म्हणून पाठिंबा दर्शवण्याची भूमिका स्पष्ट केली व पुढे म्हणाले की, आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा इतर पक्षांनी निवडणुकीत वापर करून घेतलेला आहे. व अनेक निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या समवेत केलेली आहे. मात्र या सर्वांनी आरपीआयच्या नेत्यांचा वापर केला व निवडणूक पुरते गोड बोलतात व आम्हाला कुठलीही जागा देत नाही असा आरोप करत जोपर्यंत आमची ताकद समजणार नाही तोपर्यंत आमची भूमिका बदलत राहणार असल्याचे सांगून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ l. सुजय विखे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आरपीआयचे शहर जिल्हा अध्यक्ष सुशांत म्हस्के समवेत अल्पसंख्यांक आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे…

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles