Tuesday, May 28, 2024

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ‘खेला होबे’! विखे, लंकेच्या फाईटमध्ये तिसरा तगडा भिडू कोण?

नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची होईल अशी चिन्हे आहेत. भाजपचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी श्रीगोंदा येथे बोलताना पाच लाखांचा मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांनी सुरुवातीलाच 2 लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार असा निर्धार केला आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या तरी नगरमधील लढत दुरंगी दिसत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने नगरमध्ये ओबीसी उमेदवार देण्याच जाहीर केले आहे. वंचितला तगडा उमेदवार मिळाल्यास लढत अधिक रंगतदार होऊ शकते. याशिवाय अपक्ष उमेदवारी करणारांकडेही लक्ष असणार आहे. मतदारसंघावर कायम मराठा समाजाचे वर्चस्व राहिले आहे ‌ मात्र याहि परिस्थितीत जैन समाजाच्या दिलिप गांधी यांनी दोन वेळा मिळवलेल्या विजयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नगर दक्षिणेत ऐन वेळी खेला होबे ही पश्चिम बंगाल मध्ये लोकप्रिय ठरलेली घोषणा रंगू शकते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles