Saturday, May 18, 2024

त्यांनी प्रतिभाकाकीला प्रचारात उतरवले, मी तर डोक्यावर हात मारून घेतला… अजित पवारांचा टोला..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना प्रतिभा काकींना प्रचारात उतरवलं आणि डोक्यावर हात मारला असं म्हटलं आहे.

काही लोक माझ्याविरोधात प्रचार करतात तेव्हा डोक्यात ती गोष्ट खटकते. पण मी पण ते सगळं लक्षात ठेवणार आहे. काही काही नाही का आत्ता तिकडे (शरद पवार गट) विधानसभेला इकडे, मी त्यांना सांगू इच्छितो विधानसभेलाही तिकडेच राहा. विधानसभेला माझे बारामतीकर मला ढिगाने मतदान करुन निवडून आणतील. त्यामुळे मला काळजी नाही.”

जे काही लोक माझ्या विरोधात बोलत आहेत मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांचाही फायदा करुन दिला आहे. कुणालाही रिकाम्या हाताने पाठवलेलं नाही. त्यावेळी इतकं फिरावंही लागायचं नाही. आता माझा परिवार सोडून राहिलेला माझा सगळा परिवार माझ्या विरोधात फिरतो आहे, बोलतो आहे. पायाला भिंगरी लागल्यासारख्या सभा घेत आहेत. काल-परवा तर प्रतिभाकाकीला प्रचारात उतरवलं मी तर डोक्यावर हात मारला. काकी पण १९९० पासून प्रचाराला आलेल्या तुम्हीही पाहिल्या नाहीत मी पण पाहिल्या नाहीत.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles