Sunday, May 19, 2024

अहमदनगर नागरदेवळे युवकावर प्राणघातक हल्ला, 6 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

अहमदनगर येथील युवकावर प्राणघातक हल्ला करणारे 06 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, तक्रादार पुष्कर संतोष शेलार रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर हे नागरदेवळे गावातुन त्यांचे मित्रासोबत किराणा माल घेवुन घरी जात असतांना सोहेल चाँद शेख रा. नागरदेवळे व त्याचे इतर 7 साथीदारांनी तक्रारदार यास तलवार, लाकडी दांडके, लोखंडी गजाने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मित्र यास सुध्दा शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. सदर घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. 472/2024 भादवि कलम 307, 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, आर्म ऍ़क्ट कायदा कलम 4/25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी श्री दिनेश आहेर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, रोहित मिसाळ, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, संतोष लोढे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, सचिन अडबल अरुण मोरे यांचे दोन पथके तयार करुन आरोपीची माहिती काढुन आरोपींना ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
वरील पोलीस पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन गुन्ह्याचे पार्श्वभुमीची माहिती घेतली. सदर गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर लगेच मोबाईल फोन बंद केलेले असल्याने आरोपीविषयी काहीएक माहिती मिळुन येत नव्हती. वरील दोन्ही पोलीस पथके आरोपींचे मुकुंदनगर येथील नातेवाईकांकडे माहिती काढत असतांना दिनांक 07/05/2024 रोजी पोनि श्री दिनेश आहेर, स्था.गु.शा. अहमदनगर यांना सदरचे आरोपी हे मुकुंदनगर या ठिकाणी एका शेडमध्ये लपुन बसलेले असल्याची माहिती प्राप्त झाली. पोनि श्री दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती तात्काळ पथकास कळवुन आरोपींना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करता एका पत्र्याचे शेडमध्ये 06 इसम बसलेले दिसले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) सोहेल चाँद शेख वय 26 वर्षे, रा. बुऱ्हानगर रोड, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर, 2) शोएब चाँद शेख वय 26 वर्षे, रा. सदर, 3) शोएब हमीद सय्यद वय 23 वर्षे, रा. गोटीची तालीमजवळ, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर, 4) अमीन हुसेन पठाण वय 21 वर्षे, रा. सदर, 5) साहील अकबर पठाण वय 28 वर्षे, रा. मराठी शाळेमागे, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर, 6) रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण वय 30 वर्षे, रा. विठ्ठल रुख्मीनी मंदीराजवळ, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles