Monday, May 20, 2024

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून आ.राम शिंदेसोबत बंद दाराआड दिड तास चर्चा

अहमदनगर-ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी आमदार राम शिंदे यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. उभयतांमध्ये तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र आमदार राम शिंदे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.नगर दक्षिण लोकसभेसाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भाजपची आढावा बैठक सकाळी नगरमध्ये पार पडली. या बैठकीत खासदार विखे यांनी माफीनामा सादर केला. ते म्हणाले, माझ्या स्पष्ट बोलण्यामुळे काहीजण दुखावले गेले आहेत. परंतु, त्यामागे कुणालाही कमी लेखण्याचा उद्देश नव्हता. अनवधानाने पक्षातील कुणी दुखावले गेले असतील तर त्यांची माफी मागतो, असे वक्तव्य केले. अर्थातच, त्यांचा रोख आमदार शिंदे यांच्यावर असावा. विखे यांच्या वक्तव्याला आमदार राम शिंदे यांनी उत्तर दिले. लोकसभा उमेदवारीसाठी मी प्रमुख दावेदार होतो. पण, केंद्रीय समितीने खासदार विखे यांना संधी दिली असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. बैठकीनंतर आमदार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे म्हणाले, खासदार विखे यांना माफीनामा सादर का करावा लागला. गेल्या पाच वर्षांत त्यांच्याकडून काय चूक झाले, हे ते सांगू शकतील. यावरून आमदार शिंदे यांची नाराजी दूर झाली नसल्याचे उघड झाले. दरम्यान पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार राम शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर मंत्री विखे हे साडेतीन वाजेच्या सुमारास आमदार शिंदे यांच्या सावेडी येथील निवासस्थानी पोहोचले. उभयतांमध्ये सुमारे दीड तास बंद दाराआड चर्चा झाली.या चर्चेदरम्यान मंत्री विखे यांनी राम शिंदे यांची मधनधरणी केली.आमदार राम शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे लोकसभा जागेवर शिंदे यांनीही दावा केला होता..भाजपाच्या केंद्रीय समितीने मात्र खासदार विखें यांच्या उमेदवारीवर
शिक्कामोर्तब केले. त्यानंतर शिंदे यांनी पक्षाचा निर्णय मान्य केला खरा, पण ते नाराज आहेत. त्यामुळे मंत्री विखे यांनी आमदार शिंदे यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles